भोर तालुक्यातील किकवीतील सावकारांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, किकवीतील तीन तर मोरवाडीतील एकावर गुन्हा दाखल

किकवी : सावकाराच्या जाचाला कंटाळून (लोहोकरेवाडी) मोरवाडी गावातील दीपक रमेश मोरे (वय ३३ वर्षे) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत राजगड पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोर तालुक्यातील मोरवाडी गावातील दीपक रमेश मोरे( वय ३३वर्षे) या तरुणाने गोविंद अहिरे, योगेश उर्फ सोन्या निगडे, संतोष सणस, (सर्वजण रा. किकवी, ता. भोर, जि. पुणे) या सावकारांकडून ८ लाख ६० हजार रुपये घेतले होते. हे सावकार दीपक मोरे यांच्याकडे ८ लाख ६० हजारांचे व्याजापोटी २४ लाख रुपये मागत होते. तरुणाने सावकारांना घेतलेल्या पैश्यापेक्षा जास्त पैसे दिले असतानाही संबंधित सावकारांनी वेळोवेळी तगादा करून दमबाजी करून एक दिवस अगोदर मारहाण देखील केली होती तू मर नाहीतर काय पण कर आम्हांला पैसे आणून दे म्हणत तरुणाला मारहाण केली होती.तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली गेली.

Advertisement


गोविंद अहिरे, योगेश उर्फ सोन्या निगडे, संतोष सणस, (सर्वजण रा. किकवी, ता. भोर, जि. पुणे) या सावकारांच्या जाचाला कंटाळून या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तसेच सावकाराचे पैसे फेडण्यासाठी त्यांना त्यांची जमीन विकायची होती, परंतु चुलत सासरे ज्ञानेश्वर मोरे हे जाणीवपूर्वक एजंट आणून कमी भावाने सर्व जमीन विकत मागत होते. आणि दुसऱ्या कोणाला ती जमीन विक्री करून देत नव्हते.
आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून एक दिवस आगोदर या दीपक मोरे यांना मारहाण करून त्या सावकारांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे त्यानुसार सुरेखा दिपक मोरे,  वय २८ वर्षे, व्यवसाय घरकाम, (रा. लोहकरेवाडी (मोरवाडी), ता. भोर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोविंद अहिरे, योगेश उर्फ सोन्या निगडे, संतोष सणस,(सर्वजण रा. किकवी, ता. भोर, जि. पुणे) आणि ज्ञानेश्वर मारुती मोरे(रा. मोरवाडी, ता. भोर, जि. पुणे). यांनी जामीन विक्रीस अडथळा आणला या वरून दीपक मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानुसार महाराष्ट्र सावकारी कायदा  व आत्महत्येस प्रवृत्त केले नुसार राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक झिंजुरगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page