नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात नवीन कायद्यांबाबत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन
नसरापूर : भारतीय संसदेने २०२३ मध्ये पारित केलेले भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या तीन नवीन कायद्यांबाबत शंकरराव भेलके महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राजगड पोलीस स्टेशन नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये कायदेतज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजगड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश गवळी, ॲड. शिवम पोतदार व ॲड. सुरेश शिंदे यांनी या नवीन कायद्यांमधील महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकला. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हे आणि शिक्षा यामध्ये सुधारणा करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत गुन्हेगारी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्याचे उद्दीष्ट असल्याचे सांगण्यात आले. तसेच, भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अंतर्गत न्यायालयीन साक्षीपुराव्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले गेले.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून नव्या कायद्यांबाबत शंका उपस्थित करत त्या कायदेतज्ज्ञांकडून स्पष्ट करून घेतल्या. या उपक्रमामुळे कायद्यांविषयी जागरूकता वाढून नव्या बदलांबाबत अधिक समज मिळाल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जगदीश शेवते व प्रा जाधवर डी एस यांनी केले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संजय यादव सर, डॉ. हिमालया सकट , डॉ. संगीता घोडके, प्रा. रोडे सहदेव, प्रा. डॉ. सचिन घाडगे, प्रा. संदीप लांडगे, प्रा. प्रल्हाद ननावरे, प्रा. जीवन गायकवाड, प्रा. माऊली कोंडे, प्रा. महेश कोळपे, प्रा. पोमन कोमल, प्रा. धुमाळ ऐश्वर्या तसेच महाविद्यालयातील शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.





