महिला दिना निमित्त नसरापूर आरोग्य केंद्राच्या वतीने महिला कर्करोग निदान शिबीर; २५७ महिलांची तपासणी व मार्गदर्शन
नसरापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नसरापूर प्राथमिक आरोग्य केँदाच्या वतीने दि. ८ मार्च रोजी कँन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातुन परिसरातील महिलांसाठी कर्करोग निदान व मार्गदर्शन शिबीराचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी २५७ महिलांनी तपासणी करण्यात आली. त्या मध्ये काही लक्षणे असलेल्या महिलांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयाकडे जाण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.
असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात फिरणारी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हँन जागतिक महिला दिनाच्या निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर येथे उपस्थित होती. यावेळी कर्करोग निदान शिबिर झाले शिबीराचा शुभारंभ नसरापूरच्या सरपंच उषा कदम व उपसरपंच सुधीर वाल्हेकर यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर, स्त्री रोग तज्ञ डॉ. उमेश जाधव, दंतशल्यचिकित्सक डॉ. महेश मसराम, नसरापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मवीर थोरात, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब पिसाळ, आरोग्य सहाय्यक विजय पावरा, आरोग्य सहायिका सुवर्णा पायगुडे, टीबी तालुका सुपरवायझर संदीप पाटील, जिल्हास्तरीय एनसीडी कौन्सिलर नितीन झुंजकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सारिका सुवर्णकार, डॉ. मनीषा राठोड, डॉ.शैलेश सोनवणे, डॉ. सुमेधा पाटील, ड़ॉ. साधना पोळ, डॉ मायादेवी कांबळे, गटप्रवर्तक संगीता मांढरे तसेच सर्व आरोग्यसेवक, आरोग्य सेविका आणि आशाताई उपस्थित होते.
यादरम्यान कर्करोगासाठी एकुण २५७ संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मुख कर्करोगाच्या ६ संशयित रुग्णांना बायोप्सी, १९ रुग्णांना दंतोपचार, १६ गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय औंध येथे संदर्भित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ कापसीकर यांनी सांगितले कि, महिला कर्करोग तपासणी अवघ्या पाच मिनिटात प्रत्येक आरोग्य केंद्रात मोफत होते. मात्र महिला याकडे दुर्लक्ष करतात व आजाराचे मोठे स्वरुप झाल्यावर उपचार करणे अवघड होते. यासाठी महिलांनी न लाजता व भिता प्रत्येक सहा महिन्यानंतर हि तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील मोठा धोका टळु शकतो, वेळीच उपचार घेतला तर कर्करोग बरा होतो. याबाबत अनेक लोकप्रिय अभिनेत्री या मधुन गेल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले.