आता बस प्रवासही राहिला नाही सुरक्षित! बसमध्ये चढतांना महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने चोरी; कापूरव्होळ चौकातील घटना

कापूरव्होळ : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समध्ये असलेल्या पाकिटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी (दि. २० एप्रिल) ६ वाजण्याच्या सुमारास कापूरव्होळ(ता. भोर) येथील मुख्य चौकात घडली. याप्रकरणी संगीता बाळासो काकडे (वय ५३ वर्ष, रा. पांगारी, ता. पुरंदर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाता चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला रविवारी सायंकाळी ६ वाजता कापूरव्होळ येथील मुख्य चौकात कापुरहोळ – सासवड बसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समध्ये असलेले पाकीट लंपास केले. त्यामध्ये ३३ ग्रॅम वजनाची ३ लाख ३१ हजार रुपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ व ५ हजार ५०० रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३६ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार मदने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page