नेरेतील मंदिरात अर्धा किलो चांदीच्या मुखवट्यावर चोरट्यांचा डल्ला; भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोर : विसगाव खोऱ्यातील नेरे (ता.भोर) येथील ग्रामदैवताच्या अर्धा किलो चांदीच्या मुखवट्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना रविवारी (दि. २० एप्रिल) रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत भोर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत देवाचा मुखवटा मंदिरातील घाबऱ्यातच होता. त्यानंतर आज सोमवारी सकाळी मंदिर साफसफाई तसेच देवाची पूजा करण्यास काही ग्रामस्थ गेले असता ग्रामदैवत बालसिद्धनाथ देवाचा चांदीचा मुखवटा गाभाऱ्यातून चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Advertisement

या मुखवट्याची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यानंतर तात्काळ नेरे (ता.भोर) येथील स्थानिक नागरिकांनी भोर पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेबाबत भोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page