मुळशी तालुक्यातील पौड येथे नागेश्वर मंदिरात देवीची विटंबना! ग्रामस्थांकडून गाव बंदची हाक; बाहेरील मुस्लिम बांधवाना मशिदीत प्रतिबंध

मुळशी : पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरात देवीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २ मे) रोजी दुपारी घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शिवाजी मारुती वाघवले (वय ३४ वर्ष) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार चांद नौषाद शेख (वय १९ वर्ष) आणि नौषाद शादाब शेख (वय ४४ वर्ष) यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद नौषाद शेख यांनी मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. या घटनेत देवीच्या मूर्तीवर लघुशंका व अश्लील कृत्ये करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपीने मंदिराचे गेट बंद करून मूर्तीला खाली पाडले आणि विटंबना केली. या घटनेनंतर चांद शेख याचा वडील नौषाद शादाब शेख (वय ४४ वर्ष) यांनी उपस्थित लोकांना उद्देशून “तुम हिंदू लोक आमचं काहीच करू शकत नाही” असे धमकीचे उद्गार काढल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

Advertisement

याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून परिसरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत आहेत. हे कृत्य उघड होताच नागरिकांनी सदर व्यक्तीला चोप दिला. सध्या तो ससून रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आज पौड ग्रामस्थांकडून गाव बंदची हाक देण्यात आली आहे.

बाहेरुन येणाऱ्या मुस्लिम बांधवाना मशिदीमध्ये येण्यास प्रतिबंध
पौड गावामध्ये बाहेरुन येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवाना मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पौड व स्थानिक मुस्लिम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक मुस्लिम बांधव वगळता परप्रांतीय मुस्लिम बांधव, व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लिम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधवांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page