‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमात नाटंबीच्या रोहिडेश्वर विद्यालयास तालुकास्तरीय तृतीय पुरस्कार

भोर : नाटंबी येथील राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालयाने ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमांतर्गत भोर तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकावला. स्वर्गीय नंदुकाका जगताप यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त संत सोपानकाका सहकारी बँक, सासवड यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विद्यालयाच्या शैक्षणिक व उपक्रमशील कार्याची दखल घेण्यात आली.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे बुधवारी (दि. ११) झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात शिक्षक आमदार श्री. जयंत आसगावकर, माजी आमदार संजय जगताप, आयुक्त कांतिलाल उमाप, प्रधान निर्देशक डॉ. राजेंद्र जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, मुंबई सेकंडरी को.ऑप. सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्याध्यापक महामंडळ अध्यक्ष सुभाष माने, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्ष तानाजी माने, तसेच पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सतीशजी उरसळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

मुख्याध्यापक दीपक बांदल यांनी ग्रामीण भागातही आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण रोहिडेश्वर विद्यालयाने सादर केल्याचे नमूद केले. डिजिटल शिक्षण, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष, प्रत्येक वर्गात अभ्यासक्रमानुसार टेलिव्हिजनद्वारे अध्यापन, रोटरीचे उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय शिष्यवृत्ती मिळवून देणे, तसेच नियमित अतिरिक्त तासिका घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत असल्यामुळे शाळेची निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यालयाच्या वतीने विठ्ठल भडाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यालय, मुख्याध्यापक व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page