भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांची बदली तर राजेंद्रसिंह गौर यांची नियुक्ती

भोर : भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांची नुकतीच बदली सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय येथे झाली असून त्यांच्याजागी राजेंद्रसिंह प्रभुसिंग गौर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

राजेंद्रसिंह गौर हे यापूर्वी चाकण-आळंदी येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आणि शांतता व सलोखा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीत आळंदी येथील पालखी बंदोबस्ताचे प्रभावी नियोजन व यशस्वी अंमलबजावणी त्यांनी केली.

Advertisement

गौर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील असुन ते स्पर्धा परिक्षेतून १९९२ साली पोलीस उपनिरीक्ष पदावर रुजू झाले. त्यांनी सुरूवातीला लातुर जिल्ह्यातील किल्लारी भुकंपात महत्वपुर्ण कामगिरी केली. परभणी, लातूर, नांदेड, लाचलुचपत विभाग सोलापूर, ए.टी.एस. औरंगाबाद, स्थानिक गुन्हे शाखा जालना तसेच क्राईम ब्रांच पिंपरी-चिंचवड येथे त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली.

अक्कलकोट येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी गुन्हे उकलण्यात विशेष प्राविण्य मिळवले. त्यानंतर चाकण येथे बदली होऊन त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘राष्ट्रपती पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page