भोर वन विभागाच्या वतीने नेरे व खानापूर शाळांमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा
भोर : भोर वन विभागाच्या वतीने खानापूर येथील श्री सरनोबात सिदोजी थोपटे महाविद्यालय आणि नेरे येथील पंचक्रोशी महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) झालेल्या या कार्यक्रमात पक्षी अभ्यासक कु. रवीषा बरदाडे, अनिकेत साप्ते आणि सूरज अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना जंगलातील जैवविविधता, वन्यजीवांचे रक्षण आणि संरक्षणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी पक्षीनिरीक्षण आणि वनसंवर्धनाविषयी प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला.
भोर वनविभागातील सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुग्रीव मुंढे, वनरक्षक पी. एम. माने, संदीप शिवले, समीर जाधव, सुदाम राठोड, जयश्री पवार, के. एम. हिमोणे, सुभाष गायकवाड आणि साक्षी शिंदे यांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्राचार्य डी. एस. कुमकर, वनसेवक रुनेश गोरडे आणि अविनाश चव्हाण, तसेच शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वन्यजीव आणि पर्यावरणविषयक प्रश्न विचारून आपले शंकानिरसन केले.





