भोर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर; कोणत्या गटात कोणते आरक्षण?

भोर : तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोमवारी (१३ ऑक्टोबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वीच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण पुरुषांसाठी जाहीर झाले होते. त्यामुळे भोर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटातील आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज हे आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement

जिल्हा परिषद गटांचे जाहीर झालेले आरक्षण…
१) वेळू – नसरापूर गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
२) भोंगवली – कामथडी गट : सर्वसाधारण
३) भोलावडे – शिंद गट : सर्वसाधारण
४) उत्रोली – कारी गट : सर्वसाधारण

राजकीय समीकरणे बदलणार…
या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय गणित बदलले असून, काहींना संधी मिळणार तर काहींचे उमेदवारीचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील आघाड्या, पक्षांतर, आणि नवे गट– तट तयार होण्याचे संकेतही राजकीय वर्तुळात उमटत आहेत. आता या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत भोर तालुक्यातील सत्तासमीकरणांमध्ये कोणता नवा अध्याय लिहिला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page