कारमध्ये दागिने व रोकड ठेवणे पडले महागात; खेड शिवापुरात दोन कारच्या काचा फोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरीला

खेड शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापुर गावच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडस करत कार फोडून सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ४ लाख ९६ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत विशाल दिपक मोरे (वय ४०, रा. चिखली, ता. हवेली) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी फिर्यादी मोरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी ७.३० ते ८.३५ वाजण्याच्या दरम्यान खेड शिवापुर गावच्या हद्दीतील हॉटेल आयोध्या येथे त्यांच्या फॉर्च्युनर (एम.एच. १४ एल.डी ००७७) व एर्टिगा (एम.एच. ०५ डी. एस. ८७३३) या दोन कार पार्क केल्या होत्या.

Advertisement

दरम्यान, अज्ञात चोरट्याने दोन्ही चालकाच्या ड्रायव्हर बाजूच्या काचा फोडून, आत ठेवलेल्या दोन पर्स चोरीस नेल्या. त्या पर्समध्ये दीड तोळ्यांचे सोन्याचे शॉर्ट गंठण, साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळ्यांच्या दोन गोल रिंगा, अर्धा तोळ्यांची चांदीची चैन व २२ हजार रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९६ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलीस हवालदार मुंढे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page