वेळू-नसरापूर गटात संधी मिळाल्यास विजय नक्कीच; पोपटराव सुके रणांगणात सज्ज

भोर : “संधी मिळाल्यास वेळू-नसरापूर गटातून ताकदीने निवडणूक लढवून विजयाचा झेंडा फडकवणार,” असा ठाम निर्धार राजगड साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पोपटराव सुके यांनी व्यक्त केला आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली गेली वीस वर्षे लोकसंपर्क आणि विकासकामांचा पाया मजबूत केल्यामुळे यावेळी या गटात विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जनसंपर्काचा मजबूत पाया…
पोपटराव सुके म्हणाले की, “पूर्वी वेळू-भोंगवली गटातून निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकावर आलो होतो. मात्र, गेल्या दोन दशकांपासून वेळू-नसरापूर गटात कार्यरत राहून सर्व समाजघटकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास आणि सहकार्य या वेळेस निर्णायक ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

संग्राम थोपटे आणि भाजप नेतृत्वावर पूर्ण विश्वास…
सुके पुढे म्हणाले की, “माजी आमदार संग्राम थोपटे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आजवर माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही मला संधी मिळेल आणि त्याचा मी नक्कीच सन्मान राखीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

शेती, शिक्षण, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात बहुआयामी कार्य…
पोपटराव सुके यांनी राजगड साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम, यंत्रनिर्माण पतसंस्थेच्या माध्यमातून युवकांना उद्योगासाठी आर्थिक पाठबळ, तसेच नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच त्यांनी क्रीडा, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून, खेळाडू घडविणे, धार्मिक कार्यक्रमांतून एकात्मता वाढविणे आणि स्थानिक विकास घडविणे या दिशेनेही ते सातत्याने कार्यरत आहेत.

भाजपचा झेंडा वेळू-नसरापूर गटात विजयाने फडकेल..
शेवटी सुके म्हणाले की, “राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर मला वेळू-नसरापूर गटातून संधी मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. लोकांचा आशीर्वाद आणि पक्षाचे मार्गदर्शन मिळाल्यास या वेळी भाजपचा झेंडा विजयाने फडकेल,” असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page