कार्य, निष्ठा आणि जनतेचा विश्वास जपणारे नेतृत्व; वेळू-नसरापूर गटातून गणेश खुटवड निवडणुकीच्या रिंगणात
नसरापूर : भोर तालुक्यातील वेळू–नसरापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युवक तालुका अध्यक्ष तसेच उंबरे गावचे युवा सरपंच गणेश सुरेश खुटवड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सातत्यपूर्ण सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि पारदर्शक नेतृत्व यांच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक कार्यातून उभी राहिलेली ओळख…
२०१० पासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत गणेश खुटवड महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटत आहेत. १० हजारहून अधिक दुर्गसेवकांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याबरोबरच त्यांनी रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण, पुरग्रस्त भागातील मदतकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमांतून लोकसेवा केली आहे. या समाजाभिमुख कार्याने त्यांनी जनतेच्या मनात ठसा उमटवला आहे.
राजकारणात निष्ठा आणि आदर्श…
२०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी दृढ नातं जोडून त्यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांचा प्रसार केला.
२०१७ साली उमेदवारी न मिळाल्यानंतरही पक्षाशी निष्ठा टिकवून ते कार्यरत राहिले. नंतर त्यांची तालुका युवक अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पक्ष फुटीच्या काळातही त्यांनी शरद पवार गटाशी एकनिष्ठ राहून संघटना बळकट करण्याचे काम केले.
विकासाची ठोस पावले…
उंबरे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गेल्या चार वर्षांत त्यांनी सुमारे ४ कोटी रुपयांहून अधिक विकासकामे केली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, डिजिटल ग्रामव्यवस्था आणि महिला स्वयंसहायता गटांचे सक्षमीकरण, या सर्व उपक्रमांनी त्यांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवले आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे त्यांना “कार्यकुशल आणि जनतेचा नेता” ही ओळख मिळवून दिली.
जनसंपर्कातून निर्माण झालेले मजबूत जाळे….
गेल्या नऊ वर्षांपासून वेळू–नसरापूर गटात त्यांनी सातत्याने लोकांशी संवाद ठेवला आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे ते काही मोजके तरुण नेत्यांपैकी एक आहेत. राजकीय गटफेरानंतरही त्यांनी संघर्षाची वाट धरत “कार्य हेच ओळख” हे ब्रीद जपले आहे.
युवा, स्वच्छ आणि कार्यक्षम नेतृत्व…
निर्व्यसनी, शिक्षित आणि लोकांशी एकरूप झालेले गणेश खुटवड हे शिवरायांच्या सुराज्याची प्रेरणा मनाशी बाळगून प्रामाणिक वाटचाल करत आहेत. स्वतःच्या व्यवसायासह त्यांनी समाजकारण आणि राजकारणात संतुलित भूमिका निभावली आहे.
जनतेचा विश्वास, नेतृत्वाची ग्वाही…
“माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याच्या मागे वेळू–नसरापूर गटातील जनतेचा नक्कीच ठाम पाठिंबा राहील,” असा विश्वास गणेश खुटवड यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा संयम, तळमळ आणि लोकाभिमुख दृष्टिकोन हेच त्यांचे सर्वात मोठे शस्त्र ठरत असून आज ते “जनतेच्या हृदयाशी जोडलेले नेतृत्व” म्हणून ओळखले जात आहेत.





