खेड बुद्रुक गटात विकासाचं ठाम नेतृत्व केंद्रस्थानी; मनोज पवार यांच्या कार्यशैलीची दमदार चर्चा

खंडाळा : सातारा जिल्ह्यातील खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटात सध्या एका नावाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात ठाम चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ, सातारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन खात्याचे माजी सभापती मनोज पवार. केवळ पदापुरते मर्यादित न राहता विकासाला दिशा देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून मनोज पवार यांची ओळख निर्माण झाली आहे.

बावडा गावातून घडले विकासाचे नेतृत्व…
बावडा(ता. खंडाळा) गावचे उपसरपंच असताना त्यांनी राबवलेल्या योजना आजही अनेक गावांसाठी आदर्श ठरत आहेत. खंडाळा तालुक्यात क्वचितच पाहायला मिळेल असे आधुनिक क्रीडा संकुल त्यांच्या संकल्पनेतून बावडा गावात उभे राहिले. युवकांना खेळाकडे वळवणारे हे क्रीडा संकुल, पर्यावरणपूरक बटरफ्लाय गार्डन, दर्जेदार अंतर्गत रस्ते, नव्याने उभारलेला पूल, तसेच पाण्याची शाश्वत व्यवस्था करणारे बंधारे, या सर्व विकासकामांनी बावडा गावाला सातारा जिल्ह्यातील विकासाचे मॉडेल बनवले आहे.

Advertisement

सभापतीपदातून खेड बुद्रुक गटाचा विकास…
जिल्हा परिषदेत सभापतीपदाची जबाबदारी सांभाळताना मनोज पवार यांनी केवळ एकाच गावापुरता नव्हे, तर संपूर्ण खेड बुद्रुक गटाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवला. गेल्या कार्यकाळात गटातील २१ गावांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, सामाजिक सभागृहांची उभारणी, तसेच अंतर्गत गटार योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष विकासाची दिशा ठरवणारे नेतृत्व…
“मूलभूत सुविधा आधी” या भूमिकेतून त्यांनी विकासकामांना गती दिली. राजकारण म्हणजे केवळ आश्वासनं नव्हे, तर जमिनीवर दिसणारा बदल असतो, हे मनोज पवार यांच्या कामातून ठळकपणे दिसते. शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक घटकाच्या गरजा समजून घेत विकासाची दिशा ठरवणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जात आहेत. त्यामुळेच खेड बुद्रुक गटात आज विकास, विश्वास आणि दूरदृष्टी यांचा समानार्थी म्हणून मनोज पवार यांचे नाव चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page