‘आदर्श सरपंच’ ते जनतेचा विश्वासू चेहरा : खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटात गणेश धायगुडे पाटील केंद्रस्थानी

खंडाळा : खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटात सध्या एकच नाव सर्वसामान्यांच्या चर्चेत अग्रस्थानी आहे, ते म्हणजे गणेश धायगुडे पाटील. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर, चौकात आणि शेताच्या बांधावरही नागरिक त्यांच्या कामांची उदाहरणे देताना दिसतात. अनुभवातून घडलेले आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

विकासातून जपलेली परंपरा…
खंडाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्व. नामदेवराव धायगुडे पाटील यांच्या विचारांचा वारसा लाभलेले गणेश धायगुडे यांनी तो वारसा केवळ नावापुरता न ठेवता विकासाच्या ठोस कामांतून जपला. सरपंचपदाच्या कार्यकाळात आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दहा कोटी रुपयांची विकासकामे गावात आणत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधा उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. विरोधकांनाही सोबत घेत आदर्श प्रशासन राबवल्याने त्यांना ‘आदर्श सरपंच’ हा मान मिळाला.

Advertisement

दुष्काळी भागात हिरवाईचा नवा अध्याय…
दुष्काळी परिस्थितीशी झुंजणाऱ्या भागातही गावाला हिरवाई देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामविकासाच्या योजनांमुळे गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाला. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. धायगुडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम, वृद्धांसाठी आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.

विकास, मूल्ये आणि जनविश्वास; पुढील राजकारणात निर्णायक भूमिका…
युवकांसाठी क्रिकेट, कबड्डी, खो-खो स्पर्धा आयोजित करत ग्रामीण क्रीडेला चालना दिली. बैलगाडा शर्यतींसारख्या पारंपरिक उपक्रमांनाही त्यांनी नवसंजीवनी दिली. राजकारणात विकास, समाजकारणात संवेदनशीलता आणि वारशात मूल्यांची जोड अशा त्रिसूत्रीवर उभे असलेले गणेश धायगुडे पाटील यांचे कार्य आज खेड बुद्रुक गटात चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. आगामी राजकीय घडामोडींमध्येही त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page