जावली-महाबळेश्वरच्या संस्कृतीचा जल्लोष; “उत्सव जावली महाबळेश्वरचा, पर्व २ रे” दिमाखात संपन्न

प्रतिनिधी : अनिरुद्ध शेलार (महाबळेश्वर).

स्वराज्य फाऊंडेशनतर्फे आयोजित “उत्सव जावली महाबळेश्वरचा, पर्व २ रे” हा भव्य सांस्कृतिक सोहळा प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यगृहात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. पारंपरिक कला, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक प्रतिभेचा संगम असलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.

Advertisement

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व गुणी कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून जावली-महाबळेश्वरच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यांच्या कला, समर्पण आणि मेहनतीमुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची लाभली. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या मान्यवर व रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या उपस्थितीमुळे आयोजकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.

तसेच, स्वराज्य फाऊंडेशनच्या उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या देणगीदारांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळेच अशा दर्जेदार आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी शक्य होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page