वेल्हा-सिंगापूर रोडवर गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राजगड : हवेली व भोर हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कमरेला पिस्तूल लावून थांबलेल्या एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या आदेशानुसार वेल्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेल्हा-सिंगापूर रोडवर गोवंडी गावाजवळ हा सापळा रचण्यात आला.

या कारवाईत गणेश यशवंत धरपाळे (वय ३२, रा. वांजळे, ता. राजगड, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपीवर यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार अमोल शेडगे, मंगेश भगत, सागर नामदास, तुषार भोईटे तसेच वेल्हा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, पोलीस शिपाई आकाश पाटील यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार अजय शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page