वारस हक्काच्या वादातून मामाकडून भाच्यावर कोयत्याने हल्ला; गोगलवाडीतील घटना, राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खेड शिवापूर : वारस हक्काच्या नोंदीवरून झालेल्या वादातून मामानेच भाच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोगलवाडी (ता. हवेली) येथे घडली आहे. याबाबत गणेश उत्तम इंगुळकर (वय ४२, रा. कामथडी, ता. भोर) यांनी फिर्याद दिली असून विवेक विष्णु गोगावले यांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश इंगुळकर हे दिनांक ११ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गोगलवाडी (ता. हवेली) येथे त्यांच्या मामाकडे वारस हक्काच्या नोंदीबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादीचे मामा विवेक विष्णु गोगावले यांनी संतापून घरातील कपाटाखाली ठेवलेला कोयता काढून इंगुळकर यांच्या डाव्या कानावर व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात इंगुळकर जखमी झाले असून फिर्यादीस “तुला जीवे ठार मारतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार निलेश राणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page