दारूच्या नशेत संताप अनावर; गाडीच्या वादातून पत्नीवर लोखंडी वस्तूने हल्ला! कुसगाव येथील घटना

खेड शिवापूर : भोर तालुक्यातील कुसगाव येथे पती-पत्नीमधील वादाने गंभीर रूप घेतल्याची घटना समोर आली आहे. दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरासमोर घडलेल्या या प्रकारात पतीने पत्नीवर हल्ला केल्या प्रकरणी पती विशाल अडुळकर (रा. कुसगाव ता. भोर) राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैताली विशाल अडुळकर (वय ३३, रा. कुसगाव, ता. भोर) या कामावरून घरी येत असताना त्यांचे पती विशाल अडुळकर हे दारूच्या नशेत गाडी चालवत होते. गाडी नीट चालवली जात नसल्याने पत्नीने त्यांना रागावले व स्वतः गाडी चालवू लागल्या. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

Advertisement

घरी आल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने “तु लय गाडीवाली झालीस का?” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात पाठीमागून डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण केल्याचे, तसेच हाताने मारहाण करून दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार बर्काले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page