किकवीत ‘कोहिनूर’च्या बाजूला ‘टॅंगो पंच’चा अवैध ठेका! राजगड पोलिसांकडून ११ सीलबंद काचेच्या बाटल्या जप्त

किकवी : भोर तालुक्यातील किकवी येथे सातारा–पुणे सर्व्हिस रोडलगत बेकायदेशीर देशी दारू विक्री प्रकरणी यशवंत मच्छिंद्र भालघरे (वय ३२, रा. केंजळ ता. भोर, जि. पुणे) याच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस पुनम शिवाजी मांगले यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किकवी येथील कोहिनूर बारच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दि. १७ एप्रिल रोजी यशवंत भालघरे हा बेकायदेशीर देशी दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून ‘टॅंगो पंच’ कंपनीच्या १८० मिलीच्या ११ सीलबंद काचेच्या बाटल्या असा एकूण ८८० रुपयांचा देशी दारू साठा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नाना मदने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page