भोर-रामबाग मार्गावर एसटी-इकोच्या धडकेत वरवडी खुर्द येथील तरुणाचा मृत्यू

भोर : भोर-रामबाग मार्गावर नवलाई मंदिराजवळील धोकादायक वळणावर मंगळवार (दि. ५ मे) रोजी भीषण अपघात घडला. भोर-दुर्गाडी-भोर मार्गावर धावणाऱ्या एसटी बस (एमएच ०६ एस ८२९४) आणि वरवडीकडे जाणाऱ्या इको (एमएच ०५ सीएम ५७५१) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको चालक महेश महादेव वरे (वय ३३, रा. वरवडी खुर्द) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी निलेश महादेव म्हस्के (रा. पळसोशी, ता. भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वळणावर एसटी चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वेगात बस चालवल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की इको गाडीचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका, भोर वाहतूक पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक खुटवड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page