दहावी निकालात भोर तालुक्यातील विद्यार्थ्यांची चमकदार भरारी; ९६.३८ टक्के यश, कोणती शाळा कितव्या क्रमांकावर? सर्व शाळांचा टक्केवारीसह निकाल वाचा

संपादक : दिपक महांगरे. 

भोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत भोर तालुक्याने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत ९६.३८ टक्के निकालाची नोंद केली आहे. तालुक्यातील ५० विद्यालयांपैकी तब्बल २२ विद्यालयांनी शंभर टक्के निकाल मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

तालुक्यातील ५० विद्यालयांमधून  २ हजार १०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, केवळ ७६ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले. यामध्ये ६०२ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन श्रेणीत यश मिळवले, तर ७९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच ४९४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी आणि १३८ विद्यार्थ्यांनी पास श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केली.

तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल न्हावी, नागेश्वर विद्यालय आंबवडे, वीर बाजीप्रभू देशपांडे विद्यालय शिंद, महात्मा ज्योतिबा फुले प्रशाला शिंदेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर, काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे बुद्रुक, अप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे, येसाजी कंक माध्यमिक विद्यालय करंदी-वाढाणे, मुरारबाजी माध्यमिक विद्यालय वाठार हिंगे, रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय नाटंबी, बाजी पासलकर विद्यालय बाजारवाडी, संत लिंगनाथस्वामी माध्यमिक विद्यालय निगडे, जिजामाता विद्यालय भोर, समर्थ रामदास स्वामी विद्यालय हर्डोशी, श्री समर्थ विद्यालय केळव़डे, न्यू इंग्लिश स्कूल कुसगाव, पालसिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पाले, अमृतराव बांदल विद्यालय सांगवी, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, अमृता विद्यालयम् नसरापूर, भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे, नवसह्यादी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव आदी २२ विद्यालयांनी शंभर टक्के निकालाची किमया साधली.

Advertisement

इतर विद्यालयांमध्येही अनेक शाळांनी ९० टक्क्यांहून अधिक निकाल मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यामध्ये श्री शिवाजी विद्यालय नसरापूर ९९.१५, सिदोजी थोपटे विद्यालय खानापूर ९८.०३, न्यू इंग्लिश स्कूल वरवे ९७.९५, विजय मुकुंदराव आठवले माध्यमिक विद्यालय माळेगाव ९७.९५, सारोळे माध्यमिक विद्यालय ९७.७७, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी ९७.३३, क्रांतिवीर फडके माध्यमिक विद्यालय चिखलगाव ९७.१४, शासकीय आश्रमशाळा कुरुंजी ९७.०५, रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टिटेघर ९६.९६, राजा रघुनाथराव विद्यालय ९६.१५, आपटी माध्यमिक विद्यालय ९६.१५, शासकीय आश्रम शाळा पांगारी ९६.१५, शासकीय आश्रम शाळा कुरुंजी ९५.६५, कान्होजी जेधे विद्यालय कारी ९५, न्यू इंग्लिश स्कूल कामथडी ९५, काळेश्वरी माध्यमिक विद्यालय अंबाडे ९४.७३, बारे-बसरापूर माध्यमिक विद्यालय बारे बुद्रुक ९३.७५, गर्ल्स हायस्कूल भोर ९३.५४, समर्थ विद्या मंदिर वेळवंड ९२.३०, न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली ९०.९०, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर ८८.५२, माता कुरुंजाई माध्यमिक विद्यालय कुरुंगवडी ८८.४६, माध्यमिक विद्यालय कांबरे ८६.३६, घेवडेश्वर माध्यमिक विद्यालय महुडे बुद्रुक ८२.३५, माध्यमिक विद्यालय पिसावरे ८१.८१, रायरी माध्यमिक विद्यालय ८०, राजगड ज्ञानपीठ माध्यमिक विद्यालय जोगवडी ७७.७७, पसुरे माध्यमिक विद्यालय ७५. भोर तालुक्याच्या या यशस्वी निकालामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page