प्रवाशाने चालकाला जीवे मारण्याची धमकी देत कार केली लंपास; किकवीतील घटना

किकवी : पुणे-सातारा महामार्गावरील किकवी(ता. भोर) परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईहून साताऱ्याकडे जात असलेल्या एर्टिगा कारमधील प्रवाशाने चालकाला जीवे मारण्याची धमकी देत कार पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत चालक प्रदिप रविंद्र कुमार सिंह (वय २५, रा. अंधेरी ईस्ट, मुंबई) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चालक मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना ११ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास किकवी येथील एका हॉटेल जवळ कार मधील प्रवाशाने लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवण्यास सांगितले. त्यानंतर चालकाच्या मागील सीटवर बसून “गाडीची चावी दे, नाहीतर तुला मारून टाकेन” अशी धमकी दिली.

घाबरलेला चालक खाली उतरताच आरोपीने पांढऱ्या रंगाची एर्टिगा (एम.एच. ४७ बी.वाय. १५३०) ताब्यात घेत साताऱ्याच्या दिशेने पसार झाला. सुमारे ६.५ लाख रुपये किमतीची कार चोरीस गेली असल्याचे फिर्यादीत नमूद केले असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायाळ करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page