पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; केळवडे येथे पलटलेल्या कंटेनरखाली सापडून चिखलगावच्या चालकाचा जागीच मृत्यू

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील केळवडे (ता. भोर) गावच्या हद्दीत रविवारी(दि. १७ मे) पहाटे भीषण अपघात घडला. भिवंडी येथून शिरवळकडे मालवाहतूक करणारा कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात चिखलगाव येथील चालक हनुमंत शंकर धोंडे (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा कंटेनर (एमएच ११ सीएच २४९९) भिवंडीहून माल घेऊन शिरवळकडे जात असताना केळवडे हद्दीत चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. अपघातावेळी चालकाने जीव वाचवण्यासाठी उडी मारण्याचा प्रयत्न केला; मात्र पलटलेल्या कंटेनरखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राजगड पोलीस व वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करून मृतदेह ताब्यात घेतला. हनुमंत धोंडे हे चिखलगाव परिसरातील सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page