‘नटसम्राट’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन
आपल्या जबरदरस्त अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज आकस्मिक निधन झालं.नाना पाटेकर यांचं गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते.
नाना पाटेकर यांना गोव्यातील दोना पावला येथील घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र उपचारांदरम्यान पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
१ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे जन्मलेल्या नाना पाटेकर यांचं पूर्ण नाव विश्वनाथ गजानन पाटेकर असं होतं. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये ते नाना पाटेकर या नावाने परिचित झाले होते. व्यक्तिमत्त्वातील जरब, जबरदस्त संवादफेक या बळावर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
नाना पाटेकर यांनी मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. क्रांतिवीर, तिरंगा, प्रहार, यशवंत, अब तक ५६, टॅक्सी नंबर ९२११, वेलकम अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. तसेच मराठीमध्येही सिंहासन, डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट, देऊळ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.
नाना पाटेकर यांनी अभिनयासोबत सामाजिक क्षेत्रामध्येही आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्य सुरू केले होते. नाना पाटेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह २०१५ साली नाम फाऊंडेशनची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करणे, बंधारे बांधणे व जलसंधारणाची कामे करणे याबाबत मोठं काम केलं होतं.





