यूपीआय पुन्हा डाऊन ! ग्राहकांना व्यवहार करताना येतेय अडचण
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : ग्राहकाना यूपीआय वापरून पेंमेंट करण्यासाठी आज शनिवारी(दि. १२ एप्रिल) अडचण आल्याची बाब समोर आली आहे. डाऊन डिक्टेटरनुसार सकाळी साडे अकराच्या नंतर यूपीआय वापरताना ग्राहकांना अडचण येऊ लागली.
आत्तापर्यंत हजारो जणांनी त्यांना पेमेंट करताना अडचण आल्याचे नमूद केले आहे. यावेळी पेटीएम आणि गूगल पे सारख्या प्लॅटफॉर्म वापरूनही पेमेंट करताना अडचण येत होती. गेल्या एका वर्षात यूपीआय डाऊन होण्याची ही सहावी घटना आहे.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक वापरकर्त्यांनी त्यांना पेटीएम आणि गुगल पे यासारखे ॲप वापरून पेमेंट करताना अडचण येत असल्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. ही तांत्रिक अडचण कधीपर्यंत दुरुस्त केली जाईल याबद्दलही माहिती देण्यात आलेली नाही.