भोर पोलीस स्टेशनकडून जप्त केलेली बेवारस वाहने सोडवून नेण्याचे आवाहन
भोर : भोर पोलिस ठाण्यात जप्त केलेली बेवारस दुचाकी, चारचाकी वाहने ज्या वाहन चालकांची असतील त्यांनी आपली वाहने दोन दिवसात सोडवून नेण्याचे आवाहन आवाहन भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांनी केले आहे.
भोर पोलिस ठाण्याच्या आवारात गेली चार वर्षापासून विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेली बेवारस स्थितीतील तसेच अपघाती दुचाकी, चारचाकी वाहने बऱ्याच कालावधीपासून पडून आहेत. यामध्ये १० दुचाकी, १ चारचाकी अशी भोर पोलिस ठाण्याच्या रेकाँर्डवर नोंद आहे. तरी, ही वाहने ज्या कुणाच्या मालकीची असतील त्यांनी वाहनाबाबत खात्री करून, स्वतःसह वाहनाची ओळख पटवून, मूळ कागदपत्रे आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपली वाहने पुढील २ दिवसांत ताब्यात घ्यावीत. विहित कालावधीमध्ये वाहने घेऊन न गेल्यास त्या वाहनांचा शासकीय पद्धतीने विल्हेवाट लावून ती भंगार मध्ये जमा केली जातील. त्यानंतर कोणाचाही तक्रार घेतली जाणार नसल्याचे आवाहन भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांनी केले आहे.