दापकेघर, कंकवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे पाटील यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप
भोर : गेल्या ८ दिवसापासून भोर तालुक्यातील निगुडघर खोऱ्यातील धरण पट्ट्यात मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान जिल्हा परिषद शाळा दापकेघर, कंकवाडी येथील शाळेमध्ये पावसाच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय साहित्याचे नुकसान झाले होते. या विद्यार्थ्यांना पुण्याचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून दप्तर, वह्या, कंपास इत्यादी शालेय साहित्याचे आज मंगळवारी(दि. ३० जुलै) वाटप करण्यात आले. यावेळी शाळेसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आणि शाळेमध्ये जाता-येताना पावसामुळे संरक्षण मिळावे म्हणून रेनकोट देण्याचे आश्वासन किरण दगडे पाटील यांनी यावेळी शाळा व्यवस्थापन समितीला दिले.
तसेच येणाऱ्या काळात या दुर्गम भागातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला आवश्यक ती मदत किरण दगडे पाटील युवा मंच कडून करण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी त्यांनी बोलून दाखवला. यावेळी भोर तालूका भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष अमर बुदगुडे, अप्पासाहेब चोंधे, भरत गुड्डमवार, नितीन कानगुडे, सह्याद्री रेस्क्यू फोर्स चे सचिन देशमुख, तुषार धोटे, समिर देशमुख, नथुभाऊ कंक, महीपती धानवले तसेच या शाळेतील शिक्षक अनंत अंबवले, रामदास धनावडे, प्रशांत फडगे, अशोक घिगे आदी उपस्थित होते.