भोरच्या राजकारणात नवा ट्विस्ट, राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक! कांबरे खे.बा.तील युवकांचाही पक्षप्रवेश
नसरापूर : भोर तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय हालचालींना वेग आला असून, मोठ्या प्रमाणात पक्षांतराची लाट उसळताना दिसत आहे. विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील कांबरे खे. बा. गावांतील अनेक युवकांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये माजी उपसरपंच श्रीरंग कोंढाळकर, निलेश कोंढाळकर, सुशांत धनावडे, गणेश(लालू) यादव, गणेश जाधव, प्रशांत मोहिते, प्रतिक शिंदे, दिपक शिंदे, विशाल काकडे, संतोष कोंढाळकर, देवाभाऊ कोंढाळकर, अमर कोंढाळकर, अविनाश मोहिते, गणेश यादव, कुणाल यादव, अक्षय यादव यांच्यासह अनेक युवकांचा समावेश आहे.
या सामूहिक प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून, स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीचा पगडा वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गावाच्या आणि पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी, ठोस निधी, प्रशासकीय पाठबळ आणि नेतृत्वासाठी आम्ही राष्ट्रवादीची वाट धरली असल्याचे कांबरे खे. बा. गावातील युवकांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार शंकर मांडेकर, माजी जिल्हा नियोजन सदस्य विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्यासह पक्षाचे तालुका व जिल्हा स्तरावरील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.