लहरी वातावरणाने पुणे जिल्ह्यातील बळीराजा संकटात

पुणे : पुणे जिल्ह्यात वातावरणात सातत्याने होणार्‍या बदलांमुळे रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, गहू, तरकारी पिकांसह फूल शेतीवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

गेल्या आडवड्या भरापासून पुण्यात वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कधी अवकाळी पाऊस, कधी ढगाळ, उष्णता, गार हवा असे लहरी वातावरन निर्माण होत असल्याने याचा परिणाम पिकांवर होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

Advertisement

बळीराजाने खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारीसह इतर पिकांची काढणी करून रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा, बटाटे आदी पिकांसाठी तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने फूल बागांसाठी शेतीची मशागत करून लागवड केली आहे.

पंरतू, अचानक वातावरणात बद्दल होऊन ढगाळ हवामान तसेच दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बटाटा, कांदा, ज्वारीसह फुलशेतीवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे औषध फवारणीसाठीचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page