आरोग्य उपकेंद्र किकवी येथील आरोग्यसेवक महेश कुंभार यांची तात्काळ बदली व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन – प्रहार भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते
किकवी : प्राथमिक आरोग्य केंद्र, भोंगवली अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र किकवी येथे महेश मारुती कुंभार हे आरोग्यसेवक या पदावर काम करीत आहेत. प्रहार भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांच्याकडे वारंवार या आरोग्यसेवक विषयी तक्रार येत असल्याचे त्यांनी सांगितले. उपकेंद्र किकवी येथे कुंभार येवून सही करून स्वतःच्या कामासाठी जातात व शासनाचा फुक्कटचा पगार घेतात. वरिष्ठ अधिकार्यांनी फोन वरून विचारणा केली असता, मी देवाला गेलो आहे, सर्वे करत आहे अशी चुकीची माहिती देतात.हा प्रकार बरेच वर्ष चालू असल्याचे संतोष मोहिते यांनी सांगितले.
शनिवार (दि.२५ नोव्हेंबर) रोजी सकाळी ठिक १०.०० वा. कापूरहोळ गावामधील रूग्न लोहार हे किकवी उपकेंद्रात आले होते. परंतु तिथे आरोग्यसेवक महेश कुंभार हजर नव्हते. लोहार यांनी जवळपास दीड तास वाट पाहून संतोष मोहिते यांस संपर्क करून सदर माहिती दिली. त्यांनी थोड्या वेळात उपकेंद्र किकवी येथे भेट दिली असता त्यावेळी किकवी उपकेंद्र चालू होते. त्या उपकेंद्रामध्ये एक आशाताई वर्कर हजर होत्या व त्या आलेल्या रूग्णांचा बी. पी. तपासत होत्या, संतोष मोहिते यांनी प्रत्यक्ष भेट देवून सर्व पहाणी केली असता त्यात हा प्रकार उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार येणाऱ्या तक्रारी मुळे कुंभार यांची तात्काळ बदली न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पंचायत समिती भोर यांचे कार्यालया समोर दि.१२ डिसेंबर रोजी तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल आणि याच्या होणा-या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.