दादांचा, शिलेदार कोंडीत! “शंकर मांडेकर ठरणार बळीचा बकरा”? महायुतीतील नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यातच मांडेकर व्यस्त; किरण दगडे पाटलांच्या पाठिंब्यात मात्र दिवसेंदिवस वाढ

मुळशी : भोर विधानसभेत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचाराचा शुभारंभ करून मैदानात उतरले आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत ठिणगी पडली आणि महायुतीच्या तीनही पक्षातील प्रबळ दावेदार असणाऱ्या उमेदवारांना डावलून आयात उमेदवार केल्यामुळे युतीमध्ये नाराज पदाधिकाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार झाला.

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यातच शंकर मांडेकर व्यस्त
विधानसभा निवडणुकीसाठी होणारी मतदान प्रक्रिया अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु शंकर मांडेकर हे उमेदवारी जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी बैठक घेण्यातच व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उरलेल्या काही दिवसात शंकर मांडेकर हे मतदारांपर्यंत पोहचू शकणार नसल्याची चर्चा सर्व ठिकाणी ऐकायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील राजकीय समीकरणे बसवण्यासाठी शंकर मांडेकरांना बळीचा बकरा बनवून उमेदवारी जाहीर केली असून जनतेची दिशाभूल करण्यात आली असल्याची चर्चा  मुळशीत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

Advertisement

महायुतीतील नाराज वर्गात तर किरण दगडे पाटलांच्या पाठिंब्यात दिवसेंदिवस वाढ
याच्या उलट पाहायला गेले तर भोर-राजगड-मुळशीतील अनेक विधायक कामांमुळे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मुळशीतील महायुतीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी व अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्याविरुद्ध किरण दगडे पाटील हेच तुल्यबळ लढत देणार असून शंकर मांडेकर हे महायुतीचे दिशाभूल करणारे डमी उमेदवार असल्याचे मुळशीतील जाणकारांकडून बोलले जात आहे.

किरण दगडे पाटील हे शंकर मांडेकरांना ठरणार वरचढ
याची कारणेही तशी वर्तवली जात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मांडेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते आत्ता पर्यंत प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील बड्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नसल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान किरण दगडे पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भोर मध्ये घेण्यात आलेल्या सभेसाठी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रवीण तरडे यांनी दगडे पाटील यांच्यासाठी मुळशीतील घरा घरात जाऊन प्रचार करणार असल्याचे सांगून मुळशीतील जनता ही त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभी असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टींचा विचार करता किरण दगडे पाटील हे शंकर मांडेकर यांना नक्कीच वरचढ ठरतील असे चित्र स्पष्ट झाले असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page