श्री गणेश जयंती निमित्त कोंढरी (कोंढाळकरवाडी) येथे मा. आ. संग्राम थोपटेंच्या हस्ते गणेश मंदिराचे उद्घाटन
भोर : श्री महादेव शिवाचार्य स्वामी महाराज वाईकर व मा.आ. संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर तालुक्यातील मौजे कोंढरी येथे श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट कोंढरी (कोंढाळकर वाडी) ग्रामस्थ मंडळ आयोजित श्री गणेश जयंती उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मा. आ. संग्राम थोपटे यांनी उपस्थित राहून सर्वांना श्री गणेश जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
यादरम्यान त्यांनी भव्य वास्तू शिल्प उभारणीसाठी आमदार स्थानिक निधीतून उपलब्ध केलेल्या रक्कम रू. १५ लक्ष निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडप बांधणे या कामाचे उदघाट्न केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोंढरी गावाच्या विकासासाठी अनेक माध्यमातून आपण निधी उपलब्ध केला असून भविष्यात ही उर्वरित विकास कामांच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी श्री महादेव शिवाचार्य स्वामी महाराज वाईकर, ह.भ.प.श्री. नामदेव महाराज किंद्रे, मानसिंग बाबा धुमाळ, किसनराव कंक, बापू शिरवले, विष्णू मळेकर, संजय मळेकर, बबन मालुसरे, एकनाथ म्हसुरकर, कोंढरी गावचे सरपंच अजित पारठे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळी बहुसंखेने उपस्थित होते.