खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल, राजगड पोलिसांची कारवाई
खेड शिवापुर : राजगड पोलिसांनी पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापुर(ता. हवेली) येथे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकून १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि पत्ते जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अक्षय सुभाष नलावडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की, खेड शिवापूर येथील हॉटेल गार्गी शेजारील इमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर तीन पत्ती जुगार सुरू आहे. त्यानुसार त्यांनी राजगड पोलिसांचे एक पथक सदर ठिकाणी रवाना केले.
दरम्यान, राजगड पोलिसांना घटनास्थळी १७ जण तीन पत्ती जुगार खेळताना आढळले. त्यामध्ये मकरंद दत्ता मेदने (वय २९ वर्ष, रा. सिंहगड रोड), अमित उर्फ गोपळ शिवाजी चिकुदरे (वय ३९ वर्ष, रा. बिबवेवाडी), वैभव सुभाष थोपटे (वय २७ वर्ष, रा. माणिक बाग), ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (वय ३२ वर्ष, रा. सिंहगड रोड, धायरी फाटा), विठठल बाळु दारवटकर वय २९ वर्ष, रा. पर्वती, जनता वसाहत), विनायक राम चित्ते (वय ५२ वर्ष, रा. गुरवार पेठ, क्षत्रीय भवन), गोकुळ वामन धोबी (वय ४६ वर्ष, रा. खेड शिवापुर), अनिल शशिराव माने (वय ४१ वर्ष, रा. हडपसर), फारूक याकुब शेख (वय ३९ वर्ष, रा. खेड शिवापुर), लखण महादेव बसटे (वय ३४ वर्ष, रा. सुखसागर नगर), राजकुमार केरबा शिखरे (वय ४८ वर्ष, रा. खेड शिवापुर), सलीम शाकीर शहा (वय ३० वर्ष, रा. खेड शिवापुर), शब्बीर शेख याकुब (वय ४४ वर्ष, रा. खेड शिवापुर), योगेश रकनेश मिस्त्रा (वय ४२ वर्ष, रा. हडपसर, शिंदे वस्ती), राकेश रविद्र राउत (वय ३२ वर्ष, रा. वडगाव बु.), पंकज प्रकाश गायकवाड (वय ३३ वर्ष, रा. वडगाव बु.) यांचा समावेश आहे.
ही कारवाई शुक्रवारी (दि. २० जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी प्रत्येक आरोपीच्या अंग झडतीतून जुगार खेळण्यासाठी वापरलेले तीन पत्ते आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्यामध्ये २०८ पत्त्याचे कॅट व २८ हजार ३०० रुपये रोख रकमेचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.