भोर तालुक्यात बारावीचा निकाल ९४.४३ टक्के; तालुक्यातील सर्व महाविद्यालयांचा निकाल सविस्तर वाचा

भोर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी(दि. २१ मे) दुपारी १ वाजता जाहीर झाला. यामध्ये भोर तालुक्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे.

भोर तालुक्यातील २१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेस बसलेल्या १ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन श्रेणी मिळवली आहे. ५३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्वाधिक १ हजार २७ विद्यार्थ्यांनी व्दीतीय श्रेणी मिळवली आहे. तर १६२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Advertisement

भोर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल खालीलप्रमाणे
राजा रघुनाथराव विद्यालय व ज्यु कॉलेज भोर – ९५.९७%,
छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेज भोर – ९१.४८%,
शिवाजी विद्यालय व ज्यु कॉलेज नसरापूर – १००%,
अनंतराव थोपटे कनिष्ठ महाविद्याल भोर – ८४.८७%,
गर्ल्स ज्यु कॉलेज भोर – ८२.३५%,
महात्मा ज्योतीबा फुले प्रशाला व ज्यु कॉलेज शिंदेवाडी – ८३.८७%,
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज संगमनेर – ७८.७८%,
माध्यमिक विद्यालय व ज्यु, कॉलेज खानापूर – ८३.३३%,
दिनकरराव धाडवे पाटील ज्यु कॉलेज सारोळे – ९८.३६%,
जिजामाता ज्युनिअर कॉलेज भोर – १००%,
अमृता विद्यालयम् नसरापूर – १००%,
काशिनाथराव खुटवड कनिष्ठ महाविद्याल हातवे – १००%,
क्रांतीवीर वासुदेव फडके स्मृती विद्यालय चिखलगाव – १००%,
युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय – १००%,
राजगड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स – ९८.६८%,
नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल नायगाव – १००%.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page