शिस्त, शौर्य आणि परंपरेचा संगम; वीर धाराऊंच्या कापूरव्होळमध्ये शस्त्रास्त्र शिबिराची उत्साही सांगता
कापूरव्होळ : वीर धाराऊ माता तरुण मंडळाच्या वतीने आयोजित शस्त्रास्त्र शिबिराचा समारोप सोमवारी (दि. ३० जून) उत्साहात पार पडला. शिबिराचे प्रशिक्षण सुप्रसिद्ध धारकरी ओमकार मांढरे यांनी दिले. लहान मावळ्यांना प्राचीन शस्त्रविद्येचे शिस्तबद्ध आणि प्रभावी प्रशिक्षण देत त्यांनी सर्वांची मने जिंकली.
शिबिराच्या समारोप प्रसंगी लहानग्या मावळ्यांनी पावसातही अफलातून शस्त्रास्त्र प्रदर्शन सादर केले. त्यांच्या कौशल्याने ग्रामस्थ, महिला मंडळ व उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधले. या प्रदर्शनाला भरभरून दाद मिळाली.
धारकरी मांढरे यांचा वीर धाराऊ माता गाडे पाटील यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीर धाराऊ माता तरुण मंडळाचे आधारस्तंभ शिवभक्त पंकज बाबी गाडे पाटील (सरपंच, कापूरव्होळ), उद्योजक दीपक लेकावळे, माऊली बदक, शिवप्रसाद उकिरडे, योगेश कोंढाळकर, शरद मस्के, देवेंद्र शिळीमकर(सरपंच वीरवाडी), सागर राजाराम गाडे पाटील, अजय भगवान गाडे पाटील, अक्षय सुदाम गाडे पाटील, अमीन शेख, गजानन गाडे पाटील, शंकर वीर, शशिकांत मारुती गाडे पाटील, सूर्यकांत राजीवडे पाटील, संग्राम गाडे पाटील, अक्षय जनार्दन गाडे पाटील, तुषार वांझे पाटील, अभिजीत गाडे पाटील, अमर गाडे पाटील आदी उपस्थित होते.
महिला मंडळातून सरिता गाडे पाटील, मनिषा गाडे पाटील, सुप्रिया गाडे पाटील, प्रज्ञा शरद मस्के पाटील, स्वाती गाडे पाटील, उर्मिला लेकावळे, अश्विनी गाडे पाटील यांनी सहभागी होत सन्मान व आभारप्रदर्शन केले. शिबिराचा समारोप अत्यंत सकारात्मक वातावरणात झाला. लहानग्या मावळ्यांचे शौर्य, धैर्य व शिस्त पाहून ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आणि वीर धाराऊ माता तरुण मंडळाचे आभार मानले.