भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भोर तालुक्यात विविध विकासकामांसाठी निधी मंजूर
भोर : भोर विधानसभा निवडणूक प्रमुख नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या मागणीनुसार भोर विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या कडून २५:१५ अंतर्गत १ कोटी रुपये मंजुर झाले असून यामध्ये भाबवाडी ता. भोर रांजाई माता मंदिरात सभामंडपाचे बांधकाम (५ लाख),निळकंठ (नेरे) ता. भोर येथे काळूबाई मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम(५ लाख),वडतुंबी ता.भोर भैरवनाथ मंदिर सभा मंडप बांधणे(५ लाख),सांगवी खुर्द ता.भोर पद्मावती मंदिर सभा मंडप बांधणे(५ लाख),निधन सांगवी ता.भोर भैरवनाथ मंदिर सभा मंडप बांधणे(५ लाख),कोरले ता.भोर दत्त मंदिर सभा मंडप बांधणे(५ लाख),वरवे खुर्द ता.भोर येथील गव्हाळवाडी येथे सभा मंडप बांधणे(५ लाख),टिटेघर ता.भोर येथील ब्राम्हण आळी जवळील सभा मंडप बांधणे(५ लाख), अशा प्रमाणे भोर तालुक्यासाठी विविध विकासकामांसाठी एवढा निधी मंजूर केला असल्याचे भोर तालुका भाजप युवा मोर्चा चे अध्यक्ष अमर बुदगुडे यांनी सांगितले.