राजगड तालुका दौऱ्यात शिक्षण आयुक्त रमले विद्यार्थ्यांसोबत; सामान्य कुटुंबातून IAS परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा उलगडला प्रेरणादायी प्रवास

राजगड : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे संजय नाईकडे व नामदेव शेंडकर प्राचार्य डायट पुणे यांनी आज शनिवारी (दि. १८ जानेवारी) अचानक राजगड (वेल्हे) तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी माध्यमिक हायस्कूल खानापूर, जिल्हा परिषद समूह शाळा पानशेत, जिल्हा परिषद शाळा वरसगाव व जिल्हा परिषद शाळा देशमुखवाडी या शाळांना अचानक भेट दिली.

खानापूर हायस्कूल मध्ये परिपाठामध्ये शिक्षण आयुक्तांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी व चांगले अधिकारी बनवण्यासाठी कोणते गुण आवश्यक याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तेथील शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थी व शिक्षकांनी वेळेत उपस्थित राहणे व शिस्त पाळणे ही बाब ही गरजेचे असून भविष्यामध्ये शालेय शिस्त कठोरपणे पाळणेबाबत निर्देश दिले. 

त्यानंतर सचिंद्र प्रताप सिंह आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचा ताफा पानशेत शाळेमध्ये दाखल झाला. पानशेत समूह शाळेमध्ये आनंददायी शनिवार निमित्त सर्व विद्यार्थी मैदानात बसून आनंददायी उपक्रम अंतर्गत इंग्रजी नाट्यीकरण, कविता, नृत्य, भाषा व गणित खेळ पाहिले. स्वतः शिक्षण आयुक्त तब्बल ४० मिनिटे विद्यार्थ्यांमध्ये उभे राहून विद्यार्थ्याना विविध प्रश्न विचारून संवाद साधत होते.

विद्यार्थ्यांना गणित मराठी सामान्य ज्ञान या विषयावरती चौकस प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून खुबीने उत्तरे प्राप्त करून घेत होते. विद्यार्थ्यांना विद्यार्थी मोजवयास लावणे, ९२ मध्ये किती मिळविल्यास १०० होतात? तुम्हास अभ्यास करून आयुष्यात काय व्हायचे आहे? इत्यादी प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. मी एका सामान्य कुटुंबातून घडलो असून रात्री १२ वाजे पर्यंत अभ्यास करून IAS परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. याचा प्रेरणादायी प्रवास मुलांना उलगडून सांगितला. 

पानशेत शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक, केंद्रप्रमुख या सर्वांनी समूह शाळा गुणवत्ता वाढवणे व दर्जेदार होणे संदर्भात काय प्रयत्न करावे असावी या संदर्भात सविस्तर सूचना दिल्या. तसेच पानशेत शाळेतील गच्चीवरील परसबाग पाहणी करून आयुक्तानी कौतुक केले. समवेत शिक्षणाधिकारी श्री संजय नाईकडे हे विद्यार्थ्यांना आयुक्तांचे विचारलेले प्रश्नाचे अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते.

Advertisement

त्यानंतर शिक्षण आयुक्त श्री सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हा परिषद शाळा वरसगाव व देशमुख वाडी या ठिकाणी दौरा केला. वरसगाव शाळेतील दोन्ही शिक्षकांशी संवाद साधला तेथील सरपंच आयुक्तांना भेटण्यासाठी आले असता आयुक्तांनी नम्रपणे झुकून महिला सरपंचांना नमस्कार केला. ही गोष्ट सर्वांना सुखद धक्का देणारी ठरली. एक भारतीय प्रशासनिक सेवेतील वरिष्ठ अधिकारी महिलांचाकिती सन्मान करतात व ग्रामस्थ पालकांना किती सन्मान देतात याचे ज्वलंत उदाहरण सर्वांना पहावयास मिळाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठ्या शाळेमध्ये शिकण्याचे फायदे व तोटे विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास खेळाचा विकास इंग्रजी अध्याय समृद्धीचा विकास कसा होतो हे स्वतः तेथील पालकांना व सरपंचांना समजावून सांगितले ही गोष्ट तेथील पालकांना लगेच पटली व सर्व पालकांनी आश्वासन दिले की आम्ही आमचे विद्यार्थी आता पानशेत सारख्या समूह शाळेमध्ये पाठवून आमच्या मुलांचा नक्की विकास करून घेऊ असे आश्वासन घेऊनच आयुक्त परतले. राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी प्रेरणादायी दौरा वेल्हे तालुक्यात केल्यामुळें पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिक्षकांची गुणवत्ता वाढवणे संदर्भात काय धोरण असेल याचा सविस्तर संदेश महाराष्ट्राला दिला. या दौऱ्याप्रसंगी शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, नामदेव शेंडकर प्राचार्य डायट पुणे, राजकुमार बामणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वेल्हे, राजश्री गावडे विस्ताराधिकारी बीट पानशेत, देवराम गायकवाड केंद्रप्रमुख पानशेत इत्यादी उपस्थित होते

राज्याचे शिक्षण आयुक्त पदावर असलेले भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असताना सुद्धा त्यांनी नम्रपणे झुकून महिला सरपंचांना नमस्कार करणे ही गोष्ट महिलांचा सन्मान कसे करावे ही बाब खूप आदर्शदायी व लोकांना शिकवण देणारी आहे. कमी पटावर शिकणारी एक दोन पटाच्या शाळेतील विद्यार्थी जर पानशेत समूह शाळेमध्ये सहभागी झाल्यास सदर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच चालना मिळेल याचा विश्वास वाटतो.-

       – राजकुमार बामणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजगड(वेल्हे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page