पुणे जिल्हास्तरीय ‘रायरेश्वर श्री २०२५’ अक्षय शिंदे तर ‘भोर श्री २०२५’ चा मानकरी ठरला मनीष कांबळे 

नसरापूर : एन डी फिटनेस (नसरापूर, ता. भोर) यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली रायरेश्वर श्री २०२५ व भोर श्री (भोर तालुका मर्यादित) ही स्पर्धा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन देवेश भाऊ वाडकर व दशरथभाऊ जाधव युवा मंच यांनी व बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांनी मिळून केले होते. अतिशय अतितटीच्या सामन्यात रायरेश्वर श्री २०२५ चा मानकरी ठरला ऑक्स्झिमचा अक्षय शिंदे, तर भोर मर्यादित असलेली भोर श्री २०२५ चा मानकरी ठरला बॉडी फॅक्टरी जिमचा मनीष कांबळे. या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी महारुद्र जिमचा सचिन हगवणे ठरला. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील तब्बल १५० स्पर्धकांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमास नसरापूर गावच्या सरपंच उषाताई कदम, दीपक करंजावणे, सुनील भेलके, सुनील शेंडकर, गणेश मसुरकर, शिवाजी अवचरे, निलेश पांगारकर, स्वप्निल गाडे, युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्निल गाडे, राहुल माने, आयुशा वाडकर, दामिनी वाडकर, लक्ष्मी वाडकर, अरुण झोरे, राजेंद्र पवार, ओमकार तांदळे, केतन देवकर उज्वला पांगारे, अक्षय सणस आदी मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान उपस्थितांनी सर्व स्पर्धकांचे स्वागत केले. तसेच व्यसनापासून तरुण पिढीने दूर राहून फिटनेस कडे लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे खजिनदार अजय गोळे, उपाध्यक्ष शरद मारणे, पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मंगेश परदेशी, प्रमोद नाईक, राजेश वायकर, संग्राम पवार, अतुल राऊत, कौस्तुभ शेडगे, दशरथ जाधव व देवेश वाडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण जाधव व युनूस काझी यांनी केले.

Advertisement

पुणे जिल्हास्तरीय रायरेश्वर श्री 2025 शरीरशौष्ठव स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

भोर तालुका मर्यादित, भोर श्री 2025

१) मनीष कांबळे

२) सागर कामठे

३) ओंकार खोपडे

४) रुपेश पवार

५) अतुल चव्हाण

मेन्स फिजिक्स पहिला गट

१) अजय ओझरकर

२) सागर कामठे

३) ज्ञानेश्वर वाघमारे

४) उदय शिंदे

५) ओंकार खोपडे

मेन्स फिजिक्स दुसरा गट

१) रोहन गोगावले

२) अमर पडवळ

३) प्रशांत धात्रक

४) सुशांत जाधव

५) सोमेश सुतार

५५ किलो गट

१) सैफ खान

२) अजय ओझरकर

३) सलमान नालबंद

४) निलेश गजमल

५) अखिलेश राम

६० किलो गट

१) अमोल वायाळ

२) सिद्धेश घाडगे

३) गौरव भरणे

४) अजित बोंडफळे

५) प्रवीण घरदाळे

६५ किलो गट

१) ज्ञानेश्वर वाघमारे

२) विनायक कलरीकंडी

३) उदय शिंदे

४) ओंकार उखळे

५) सुनील कुमार

७० किलो गट 

१) प्रशांत कोराळे

२) अजय रक्ताटे

३) जी शंकर

४) अनिकेत पवार

५) अनिल धनगर

७५ किलो गट

१) अमर पडवळ

२) शंकर शिंदे

३) विजय सरोज

४) वेदांत अंबिके

८० किलो गट

१) सचिन हगवणे

२) ओंकार नलावडे

३) मनीष कांबळे

४) धैर्य वीर

५) मयूर कानसकर

८० किलो वरील गट

१) अक्षय शिंदे

२) फिरोज शेख

३) ऋत्विक जाधव

४) श्रीतेज देसाई

५) अनिकेत भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page