दुग्गड यांनी केले कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष मोहिते यांचे निवेदन
भोर : कमाल जमिन धारण कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करत पुण्यातील बड्या उद्योजकावर शासन नियमानुसार कारवाई होणेबाबत निवेदन शिवस्वराज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष मोहिते यांनी प्रांत अधिकारी भोर यांना नुकतेच दिले आहे.
याबाबत निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रविण माणिकचंद दुग्गड, प्रमोद माणिकचंद दुग्गड, किर्ती माणिकचंद दुगड, आकाश दुग्गड, तेजस दुग्गड, प्रकाश दुग्गड व इतर दुग्गड यांची संपूर्ण महाराष्ट्रात शेतजमिनी खरेदी जमिनींची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रातील शेतक-याला शासनाने ८ एकराचे सिलींग लावले आहे. मग या दुग्गड खातेदाराला गटाचे क्षेत्र त्यांचे खरेदी मिळकतीचे ७५ एकर खरेदी करून त्यांनी त्याच्या नावावर खरेदी केले आहे. या खातेदाराला नियम वेगळा आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे? या एका गावामध्ये करंदी खे.बा. (ता.भोर जि.पुणे) येथे असा हा खातेदार आहे. नगर जिल्ह्यात तसेच पुणे जिल्ह्यातील व शहरातील विविध भागात शेकडो एकर जमिनी दुग्गड यांनी स्वतःच्या नावावर खरेदी केलेल्या आहेत. त्यामध्ये हवेली तालुक्यातील जांभुळवाडी, कोळेवादी, कात्रज, पुणे येथील जैन मंदिर, तसेच मुळशी तालुक्यात हडपसर व पुणे जिल्हयातील विविध तालुक्यात हजारो एकर जमिनी एका-एका दुग्गड व्यक्तीच्या नावावर आहेत. त्यातीलच प्रविण माणिकचंद दुग्गड या बडया उदयोजक व्यावसाईकाने कमाल जमिन धारणा कायदयाचे उल्लंघन करून शासनाची व शेतक-यांची घोर फसवणूक केलेली आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
कमाल जमीन धारणा कायदा असा सांगतो की, जिरायती क्षेत्र हे एका व्यक्तीच्या नावावर फक्त एकूण 54 एकर असावं लागते, त्याहीपेक्षा जास्त क्षेत्र प्रवीण दुगड यांचे नावावरती एकट्या करंदी खे. बा. गावामध्ये आहे. आणखीन इतर ठिकाणी देखील दुगगड परिवाराच्या शेकडो एकर जमिनी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रशासन करणार का?जमीन सिलिंग होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.