राजगड पोलिसांचा पुन्हा एका मटका अड्ड्यावर छापा… राजगड पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरावर कौतुक…
खेड शिवापूर : मंगळवार (दि.१७) रोजी राजगड पोलिसांना खेडशिवापुर ता.हवेली, जि.पुणे च्या हद्दीत कोंढणपुर फाटा येथे एक व्यक्ती मटका चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.यानंतर राजगड पोलिसांनी मंगळवार(दि.१७) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोंढणपुर फाट्या कडे आपला मोर्चा वळवला. तेथे त्यांना कोंढणपुर फाटा ब्रीज खाली मोकळे जागेत कालीदास नरसिंग आखाडे (वय ४१ वर्षे) रा.शिवाजीनगरवस्ती खेड शिवापुर ता. हवेली, जि. पुणे हा कल्याण नावाचा बेकायदेशीर बिनापरवणा मटका स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता चालवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे रोख रक्कम ६४० रुपये व मटका चालविण्यासाठी लागणारे साधन आढळुन आले आहे. राजगड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार कोल्हे करीत आहेत.