राजगड पोलिस स्टेशन हद्दीतील गोगलवाडी येथे घरासमोरून दुचाकीची चोरी
खेड शिवापूर : राजगड पोलिस स्टेशन हद्दीतील गोगलवाडी (ता.हवेली) येथून गुरुवार (१ फेब्रुवारी) रोजी रात्री मोटार सायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. गोगलवाडी येथील गणेश सोपान गोगावले (वय ३७ वर्षे) यांच्या राहत्या घरा समोरून होन्डा कंपनीची काळया रंगाची सी बी शाईन मोटर सायकल (एम एच १२ आर डब्ल्यु ६१११) चोरीला गेली आहे. मोटासायकल ची अंदाजे किंमत ५०,००० रू. आहे. अज्ञात चोरट्यांनी ही मोटार सायकल चोरून नेली असल्याची कायदेशीर फिर्याद राजगड पोलीस स्टेशन येथे आज शुक्रवारी (२ फेब्रुवारी) दाखल करण्यात आली आहे. गणेश गोगावले यांच्या फिर्यादी वरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात राजगड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार तुषार खेंगरे करीत आहेत.