“दादासोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय,सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..” रुपाली चाकणकरांची टीका
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जातांना पाहायला मिळत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. दरम्यान आज अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ‘सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजित पवारांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य केले आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?”अजितदादांनी जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे. असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच आगामी निवडणूकीत महायुतीचा विजय होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी बोलताना रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला. “दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. विकासाचे राजकारण हवं आहे. सुप्रिया ताई गेले १५ वर्ष अजितदादांमुळेच निवडून आल्या आहेत. दादासोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय..” अशी टीका त्यांनी केली. महायुतीचा उमेदवार विजयी होईल”प्रत्येकाची लढण्याची इच्छा असते, स्पर्धक असतात त्यामुळे खडकवासला मध्ये अनेक इच्छुक आहेत, असे त्या म्हणाल्या. तसेच बारामती लोकसभेमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल…” असा दावाही त्यांनी यावेळी केला.