भोर तालुक्यातील टापरेवाडी येथे गुळ महोत्सवाचे आयोजन, शेतकऱ्यांना गूळ बनवण्याचे प्रात्यक्षिक मोफत पाहता येणार

सारोळा : साखरेपेक्षा ही आरोग्यदायी मानला जाणाऱ्या गुळाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामध्ये ही गो आधारित नैसर्गिक गुळाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने टापरेवाडी (ता.भोर) येथे रविवारी (दि. ४ जानेवारी) गुळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगतशील शेतकरी रंगनाथ टापरे यांच्या शेतात सकाळी १० ते ५ या वेळेत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या गुळ महोत्सवाचे उद्घाटन गुरुवर्य मोहन महाराज मोरे, व पचंगव्य चिकित्सक संतोष कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Advertisement

या गूळ महोत्सवात नैसर्गिक पद्धतीने ऊस पिकविण्यापासून गूळ तयार करण्यापर्यंतच्या नैसर्गिक पद्धतीची माहिती देण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने गुळाचे फायदे, गूळ तयार करण्याची प्रक्रिया तसेच उसापासून कोणकोणते वेगवेगळे पदार्थ बनवले जातात याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. या महोत्सवात सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंगेश ज्ञानोबा टापरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१७३२२४६ यांच्याशी संपर्क करावा.

गो आधारित नैसर्गिक गुळ तयार करण्यासाठी ऊस सुद्धा नैसर्गिक पद्धतीने पिकवणे गरजेचे आहे, या महोत्सवात गुळ तयार करण्याची प्रक्रिया तसेच उसापासून कोणकोणते वेगवेगळे पदार्थ बनवले जातात याविषयीची माहिती उपस्थिती लोकांना देण्यात येईल.
- रंगनाथ टापरे(प्रगतिशील शेतकरी टापरेवाडी, ता.भोर, जि.पुणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page