भोर तालुक्यातील तरुणाई ऑनलाईन रमीच्या विळख्यात. ऑनलाईन जुगार युवकांचे नैराश्य व्यसन व आत्महत्येस कारणीभूत
संपादक :- दिपक महांगरे
भोर:- महाराष्ट्रा सह देशात सुरू असणाऱ्या रम्मी सारखा ऑनलाइन जुगार खेळ तरुण पिढीसाठी घातक ठरत आहे. त्यातून अनेकांचे प्रपंच उध्वस्त होत आहेत. जुगाराने आर्थिक नुकसान झाल्यास युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत तर नैराश्यातून आत्महत्या देखील करत आहेत.
भोर तालुक्यात गेल्या काही दिवसात हे विदारक चित्र गावा-गावात चौका-चौकात पाहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यतः 20 ते 40 वर्षातील तरुण पाहायला मिळत आहेत..हे जुगारी ॲप मोबाईल वर चुटकी सरशी उपलब्ध होत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी अडकली आहे..काही काही तरुण तर संपूर्ण च्या संपूर्ण पगार संपवत आहेत.. बॉलीवूड मधील सिनेअभिनेत्यांच्या आकर्षक जाहिराती मुळे तरुण वर्ग त्याकडे आकर्षित होत आहे..
जुगाराच्या या गेम्स च्या आहारी जाऊन बरबाद होण्या अगोदर याचे समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे. आणि मुख्य म्हणजे जुन्या ज्येष्ठ लोकांना मोबाईल वरील या जुगराबाबत जास्तीची माहिती नाही. त्यांची मुले मोबाईल वर काय करतात या बाबत त्यांना समजत नाही . मुलगा जेव्हा आर्थिक उध्वस्थ होऊन बसतो तेव्हाच त्यांना ते समजत आहे. आणि ज्यांना याचा फटका बसला आहे असे लोक खुलेआम चर्चा न करता समाज,पाहुणे-रावळे प्रतिष्ठा यामुळे मुलांचे असेल धंदे झाकून घेत आहेत. आणि गुपचूप मुलांनी केलेली लाखो रुपयांची देनी देत आहेत.या विकृती बद्दल आपल्या मुला-बाळांना, मित्र ,नातेवाईकांना सांगा. स्वनियंत्रन गमावण्याच्या अगोदरच स्वतःला,कुटुंबाला,समाजाला सांभाळा आणि वाचवा.
ऑनलाइन जुगाराच्या संकटाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर यात अनेक कुटुंब उध्वस्त होतील. तरुण यात बरबाद होणार आहेत. यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाने ऑनलाइन जुगारी ॲप वर बंदी घालने आवश्यक होते. परंतु कौष्यल्याचा खेळ म्हणून यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पालकांनी आपली मुले मोबाईल मध्ये नेमके कोणते ॲप वापरतात हे पाहिले पाहिजे व त्याचे फायदे तोटे मुलांना सांगणे आवश्यक आहे. तसेच सध्या घडणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या गोष्टी त्यातून होणारे नुकसान हे खोट्या प्रतिष्ठे पायी झाकून न ठेवता त्याबाबत चर्चा केली पाहिजे. तरच भविष्यात अशा गोष्टींना आळा बसेल असे वाटते.