सातारा जिल्हा पोलीस दलातील तब्बल ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांची शिरवळ तर फलटण शहरचे सुनील शेळके यांची खंडाळा पोलीस स्टेशन येथे बदली
सातारा (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस दलातील १० पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलीस निरीक्षक आणि २० पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२, पोटकलम २ अन्वये जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढले आहेत.
पोलीस स्टेशन/ शाखा – पोलीस निरिक्षक, खालीलप्रमाणे
कराड शहर – के.एन.पाटील
फलटण शहर – हेमंतकुमार शहा
शिरवळ – संदीप जगताप
खंडाळा – सुनील शेळके
जिल्हा विशेष शाखा – बाळासाहेब भरणे
वाचक (रीडर) पोलीस अधीक्षक – विश्वजीत घोडके
मानवी संसाधन पोलीस कल्याण (वेलफेअर) – विकास पाडळे
जिल्हा वाहतूक शाखा – प्रदीप सुर्यवंशी
सायबर पोलीस स्टेशन – धनंजय फडतरे
कराड पोलीस स्टेशन गुन्हे विभाग – वंदना श्रीसुंदर
पोलीस स्टेशन/ शाखा – सहाय्यक पोलीस निरीक्षक, खालीलप्रमाणे
वाठार – अशोक हुलगे
औंध – चिमाणजी केंद्रे
रहिमतपूर – शिवाजीराव विभुते
मल्हार पेठ – चेतन मछले
तळबीड – किरण भोसले
पाटण – राहूल वरोटे
कराड शहर – उत्तम भापकर
कराड शहर – गणेश कड
फलटण शहर – विशाल वायकर
सातारा शहर – अमित बाबर
वाचक अपर पोलीस अधीक्षक – राजेश माने
जिल्हा वाहतुक शाखा – अनिता मेणकर
कराड शहर – संदीप कामत
वाहतुक नियंत्रण शाखा, कराड शहर – संदीप सुर्यवंशी.