प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोर शहराच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
भोर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोर शहराच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. २६ जानेवारी) भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांपासून खुल्या गटातील मुला मुलींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भोर, राजगड, मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते होणार असून “एक पाऊल आरोग्यासाठी” हा या स्पर्धेचा हेतू असल्याचे भोर नगर परिषदेचे मा. गटनेते यशवंत डाळ व भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदार देशपांडे यांनी सांगितले.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये होणार आहे. त्यामध्ये इ. ५ वी ते ७ वी, इ. ८ वी ते १० वी तसेच खुल्या गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग राजवाडा चौक, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती चौपाटी, महाडनाका, भुईआळी, काळा दत्त मंदिरामागे, सम्राट चौक ते राजवाडा चौक असा असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तीनही गटांसाठी रोख बक्षिसे, सहभागी विद्यार्थ्यांसाठी मोफत टी शर्ट, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ९८२२६५६५१९, ९८८१७६९७९७, ९०११८३२००५, ७३५०२८२०३० या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सोमनाथ ढवळे, अतुल काकडे, कुणाल धुमाळ, सनी साळुंके यांनी केले आहे.