नसरापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नामदेव चव्हाण यांची बिनविरोध निवड

नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच सुधीर वाल्हेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत नामदेव आत्माराम चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच उषा विक्रम कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या सभेत ही प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार कुलकर्णी यांनी चव्हाण यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

Advertisement

ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत फक्त नामदेव चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सभेला सुधीर वाल्हेकर, सरपंच उषा कदम यांच्यासह सदस्य रोहिणी शेटे, सपना झोरे, संदीप कदम, गणेश दळवी, इरफान मुलानी, मेघा लष्कर आणि श्रद्धा हडके उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच नामदेव चव्हाण यांचं भरत शेटे, हनुमंत कदम, प्रकाश चाळेकर, उत्तम निकम, अनिल शेटे, विक्रम कदम, सागर राशिनकर, श्रीकांत वाल्हेकर, संतोष हाडके, सुभाष चव्हाण, विजय जंगम, बबनराव जाधव, सचिन कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. नामदेव चव्हाण यांच्या निवडीने नसरापूरमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामपंचायतीच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page