मनोज जरांगे पाटलांची तोफ २० तारखेला पुण्यात धडाडणार…१०० एकर जागा सभेसाठी राखीव…
पुणे : मनोज जरांगे पाटील यांची काही दिवसांपूर्वी विराट सभा अंतरवली सराटी याठिकाणी पार पडली. मराठा बांधवांकडून त्यांच्या या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सभेनंतर आता जरांगे पाटलांची सभा पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील खेडमध्ये जरांगे पाटलांची पुढील सभा पार पडणार आहे. येत्या २० ऑक्टोंबर रोजी खेडमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे पुण्यात जरांगे पाटलांना कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.जरांगे पाटलांची पुण्यात पहिल्यांदाच भव्य सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे जोरदार तयारी करण्यात आली आहे. सध्या मराठा समाजाच्या प्रश्नांवर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आणखी दहा दिवस सरकारला दिले आहे. त्यापूर्वी ते राज्यात वेगवेगळया ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत.जरांगे पाटलांची पहिली सभा आंतरवाली सराटी येथे पार पडली. या सभेला लाखो मराठा बांधवांनी गर्दी जमवली होती. सभेनंतर आता पुन्हा जरांगे पाटील यांची भव्य सभा खेडमधील राजगुरुनगर पार पडत आहे. या सभेसाठी १०० एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसे सभेची तयारी आत्तापासूनच करण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा आंतरवाली सराटी सभेपेक्षा भव्य असणार असल्याचे म्हटले जात आहे.