BHOR BREAKING : पैशाच्या देवाण घेवाणीतून उत्रौलीतील तरुणाचा खून 

भोर : भोर तालुक्यातील पोम्बर्डी गावच्या हद्दीतील स्टोन क्रशर जवळ पैशाच्या देवाण-घेवाणीतून तरुणाचा खून झाल्याची खळबळ जनक घटना शनिवारी(दि. ८ फेब्रुवारी) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. विक्रम दादासाहेब गायकवाड (वय ३० वर्ष, रा. उत्रौली ता. भोर) असे मयत तरुणाचे नाव असून अनुज मल्हारी चव्हाण (वय अंदाजे २४ वर्ष, रा. वेनवडी, ता.भोर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सागर दादासाहेब गायकवाड (वय २८ वर्ष) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Advertisement

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विक्रम गायकवाड याने संशयित आरोपी अनुज मल्हारी चव्हाण (वय २४, रा. वेणवडी, ता. भोर) याच्याकडे हात उसने दिलेले पैसे परत मागितले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या अनुज चव्हाण याने धारदार शस्त्राने विक्रमवर अनेक वार केल्यामुळे गंभीर जखमी झाल्यामुळे विक्रमचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक दिलीप पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णा पवार आणि त्यांची टीम या घटनेचा तपास करत आहे. प्राथमिक चौकशीत आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून हा वाद उफाळल्याचे समजले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page